चंद्रपूर : शिक्षक मतदारसंघाची निवडणूक (Teacher Constituency Election) चुरशीची मानली जात होती. भाजपने (BJP) दोन वेळा निवडून आलेले नागो गाणार (Nahi Ganar) याना आपला अधिकृत पाठिंबा दिला होता. मात्र (Mahavikas Agadi) महाविकास आघाडीने (Chandrapur) चंद्रपूरचे भूमिपुत्र सुधाकर अडबाले (Sudhakar Adbale) यांना पाठिंबा दिला. यापूर्वी पदवीधर मतदार संघात भाजपचा बोलबाला होता. सुधाकर अडबाले यांच्या विजय (Victory) महाविकास आघाडी साठी महत्त्वाचा मानला जात आहे.
Whatsapp Channel |
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या स्थापनेनंतर तब्बल 75 वर्षाने चंद्रपूर जिल्ह्याला सुधाकर अडबाले यांच्या रूपाने विधान परिषदेत जाण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. महाविकास आघाडीतील ज्येष्ठ राजकीय नेत्यांनी, जुन्या पेन्शन संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सर्व समर्थकानी सुधाकर अडबाले यांच्या प्रचारार्थ कंबर कसली होती. त्यामुळे नागपूर शिक्षक मतदार संघात सुधाकर अडबाले यांना विजय मिळाला. #chandrapurtak