शिक्षण क्षेत्रात होणारी पालकांची लूट नवी नाही. मात्र एका दुकानदाराने पालकांशी केलेले दूरवर्तन बघून पालक चांगलेच संतापले आहेत. विशिष्ट दुकानातूनच गणवेश खरेदी करण्याचा तगादा नारायणा विद्यालयाने लावला. त्यामुळे हवी ती रक्कम दुकानदार घेत आहे. अवाजवी पैसे घेणाऱ्या दुकानदाराला एका पालकाने प्रश्न करताच दुकानदार संतापला. औकात नही है, तो बच्चो को पढाते क्यू हो? असे बोचरे शब्द वापरलेत. त्यामुळे पालक संतापले आहेत.
Whatsapp Channel |
चंद्रपूर येथील पडोली स्थित नारायणा विद्यालय (Narayana Vidyalayam) आहे. या विद्यालयाने विद्यार्थाच्या गणवेष एका विशिष्ट दुकानातून खरेदी करण्याचा तकदा लावला. या दुकानदाराकडून पालकांची मोठी लूट सुरु आहे. 1000 रुपयात मिळणारा गणवेश पाच हजारात पालकांना खरेदी करावा लागत आहे. विद्यार्थांचे गणवेश इत्तर दुकानात अतिशय कमी दरात उपलब्ध असताना तेथून न घेता त्यांनी नेमलेल्या कंत्राट दाराकडून घेणे बाबत विध्यार्थी व पालकावर दबाव टाकला जात असल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
एका पालक हे मुलाचा शूज घेण्याकरिता गेले. संबधित दुकानदाराने संपूर्ण ड्रेस विकत घ्यावे लागेल असे म्हंटले. तसेच संपूर्ण ड्रेस व शूज तुमी घेवू शकत नसल्यास तुमी तुमच्या मुलाला नारायणा विद्यालय येथे कश्याला शिकविता. तुमची लायकी नाही असे म्हंटले. नारायणा विद्यालयातील मुख्यध्यापक, शिक्षक हे मुलांना शूज नसल्यामुळे त्यांनी सांगितलेल्या दुकानातून गणवेश खरेदी न केल्याने आमच्या मुलांना वर्गा बाहेर ठेवण्याची धमकी देत आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. विद्यालयाचा या हुकमशाही विरोधात पालक संताप करीत आहेत. अश्या हुकुमशाही विद्यालयाची नोंदणी रद्द करण्यात यावी व संबधित कर्मचाऱ्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी पालकांनी केली आहे.