चंद्रपूर : घुग्घुसचे दादा तसे घुग्घुस बाहेर पाय ठेवत नाहीत मात्र विधानसभेची निवडणूक जवळ आली की दादाला राजुरा आठवतोय. आता दादांनी राजुरा येथे जनसंपर्क कार्यालय थाटले. या कार्यालयाचा उद्घाटनाला भाजपचे माजी आमदार असलेल्या भाऊंनी दांडी मारली….
Whatsapp Channel |
विशेष म्हणजे या कार्यक्रमाचावेळी दादा अचानक ‘मामा’ झाले. आमदारकीचे गोड स्वप्न पडूलागलेल्या दादाचे मागील वेळी प्रमाणे ‘मामू’ होवू नये म्हणजे कमावले.
राजुरा विधानसभा मतदार संघ हा नेहमी चर्चेत असतो. निवडणूक आली की मतदार संघाची चर्चा अधिक होते. शेतकरी संघटना तथा विदर्भवादी नेते ऍड. वामनराव चटप, काँग्रेसचे विद्यमान आमदार सुभाष धोटे, भाजपचे माजी आमदार ऍड. संजय धोटे यांच्या प्रभाव या मतदार संघावर आहे. बघता बघता या मतदारसंघाचे चित्र केव्हा बदलेल याचा नेम नाही. इथे आता काही नवे चेहरे एन्ट्री मारण्याच्या तयारीला लागले आहे. भाजपाने इथे पार्सल पाठविण्याची तयारी चालविली अशी चर्चा ऐकायला मिळत आहे. हा पार्सल कोण असेल ? यावर चर्चा सुरु असतानाच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या जवळचे समजले जाणारे देवराव भोंगळे यांनी राजुरा येथे जनसंपर्क कार्यालय उघडले.
2019 च्या निवडणूकी दरम्यान भोंगळे यांना उमेदवारी मिळेल अशी चर्चा होती मात्र उमेदवारी मिळाली ऍड. धोटे यांना. भोंगळे यांचे कार्य कर्तृत्व फार मोठे नाही. भाऊंचा आशीर्वाद आपल्याच डोक्यावर आहे असा गोड समज झालेल्या भोंगळे यांना पुन्हा आमदारकीचे गोड स्वप्न पडू लागले, अशी चर्चा राजुरा विधानसभा क्षेत्रात रंगू लागली आहे.
पहिल्याच कार्यक्रमात ‘मामू’ झाले…
देवराव भोंगळे यांना दादा या उपाधीने ओळखले जाते. मात्र राजुरात झालेल्या जनसंपर्क कार्यक्रमाचा उद्घाटनाप्रसंगी कार्यकर्त्यांनी भोंगळे यांना ‘मामा’ म्हणून हाक मारली. सध्या भोंगळे याच्या पाठीशी असलेले कार्यकर्ते प्रामाणिकपणे उभे उभे आहेत की त्यांना ‘मामू’ बनवित आहेत हे येत्या काही दिवसात कळणार आहेच.