चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस हि औद्योगिक नगरी म्हणून ओळखली जाते. यामूळ परराज्यातील अनेक लोकांनी रोजगारानिमीत्ताने आपले पाय रोवले. एकीकडे मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी असल्या तरी येथील सातत्याने वाढणारी गुन्हेगारी चिंताजनक आहे. घुग्घुस कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. पण दरम्यानच्या काळात भाजपने मोठ्या शिताफीने काँग्रेस चे वर्चस्व संपविले. बराच काळ भाजपने सत्ता गाजविली. अशावेळी व्यवसायाने ठेकेदार असलेल्या युवा नेत्याने पक्षाची सुत्र आपल्या हाती घेतली अन पुन्हा चित्र पालटल. घुग्घुसमध्ये आता भाजपची पुर्णपणे पिछेहाट झाली असून कमालीचा आत्मविश्वास वाढल्याने काँग्रेस फ्रन्टफूटवर आलेली आहे.
Whatsapp Channel |
चंद्रपूर जिल्ह्यात घुग्घुसची वेगळीच ओळख आहे. घुग्घुस रोजगार देणार शहर आहे. पन येथील राजकारण खुणेरी आहे.
राजकीय आरोप करताना सुरवातीला थोडीफार सभ्यता,
मानमर्यादा राखली जायची. पण आता आरोप करताना वैयक्तिक मुद्दे घेत टार्गेट केल्या जात आहे. एकंदरीत घुग्घुसच्या राजकारनाने अतिशय खालची पातळी गाठली आहे.
रोजगाराच्या शोधात परराज्यातील अनेक कुटूंब इथ कायमसाठी स्थिरावली. यातील काही मात्तबरांनी राजकारणात आपले पाय घट्टपणे रोवले. या गावातील राजकारण हे अतिशय गंभीर आहे.
राजकारणातून अनेकांना जिव गमवावा लागला. हत्या, चाकूहल्ले, टोळीन होणारी मारहाण यामुळ घुग्घुसची चर्चा सःपुर्ण जिल्ह्यात होत असते. कधीकाळी घुग्घुसचा गड काँग्रेस च्या ताब्यात होता. त्यांच्या एकछत्री सत्तेला सूरूंग लावण्यासाठी भाजपला पाणी प्यायला लागायचे. मात्र भाजपच्या एका नेत्याने काँग्रेस फोडली. अनेक मातब्बर कार्यकर्त्यांना सोबत घेतले. पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमावर जोर दिला. सातत्याने राजकीय धोरण राबवित भाजपच्या त्या नेत्याने राबविलेल्या मोहिमेने काँग्रेस पुरती हतबल झाली. पक्षाची अवस्था बघता अनेकांनी काँग्रेसचा साथ सोडला.
काँग्रेसची अतिशय बिकटअवस्था असतांना व्यवसायाने ठेकेदार असलेल्या एकनिष्ट युवा नेत्याने पक्षाला ताकत देण्यासाठी स्वत;च्या खांद्यावर धूरा उचलली. त्यांनी आपल्या सोबत आपल्या राजकीय अनुभवी मित्राची साथ घेतली. अन यानंतर पंचायत समितीची पोटनिवडणूक लागली. काँग्रेसने आपली पुर्ण ताकत लावली. पण इथेही अळथळे आले. काँग्रेसच्याच एका गटाने बंडखोरी केली. अशा आणीबाणीच्या वेळी काँग्रेसच्या युवा नेत्याने आपले कौशल्य पणाला लावले. अन त्यांनी केलेल्या परिश्रमाला फळ आले. या निवडणूकीत त्यांनी भाजपला जबरदस्त धक्का दिला. निवडणुकीत भाजपा तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेली. तर अंतर्गत गटबाजी झाल्याने काँग्रेस ला दुसऱ्या स्थानवर समाधान मानाव लागल.
लोकसभेच्या निवडणूका लागल्या अन पुन्हा या युवा नेत्याचा कस लागला. आपल्या अनुभवी मित्राला सोबत घेत त्यानी घुग्घुसमध्ये पाणीपत केल. युवा नेत्याच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला घुग्घुसमध्ये आच्छे दिन आले आहेत. अनेक भाजपचे नेते, कार्यकर्ते काँग्रेस मध्ये प्रवेश करित आहेत. या सःपुर्ण बदललेल्या राजकीय परिस्थीतीन भाजपमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे.
भाजप बँकफूटवर येताच त्यांनी गलीच्छ राजकारणाला सूरवात केली आहे. हल्ली घुग्घुसमध्ये राजकारणातून वैयक्तिक चारित्र्याचे हनन करण्याचे प्रकार वाढलेआहेत.
Ghugus Poltical Story Part-1