चंद्रपूरची नव्हे तर राज्यातील राजकारणातील मोठं नाव सुधीर मुनगंटीवार. त्यांनी केलेला विकासाच्या झंजावात बघता त्यांना विकास पुरुष ही उपाधी बहाल करण्यात आली. मात्र मुनगंटीवार यांनी केलेला विकास अनेकांना पसंत पडला नाही. जिथं मुनगंटीवारांनी भरीव कार्य केलं तिथंच त्यांना फारच कमी मते मिळाली आहेत. स्वतःच्या विधानसभा क्षेत्रात ते मागे पडलेत. खरंतर कोटी कोटीची कामे त्यांनी केली खरी मात्र बहुतांश कामे रस्ते, गार्डन, जुन्या इमारती पाडून नवीन इमारती, स्टेडियम अशी होती. त्यात सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावावर करोडो रुपये खर्च करून नुसते इव्हेंट झालीत. मतदारांनी याला नाकारलं. दुर्गापूर आणि उर्जानगर येथून फारच कमी मतदान मुनगंटीवारांना झालं आहे. जेवा की या भागात त्यांनी अनेक विकासकामे केली आहेत.
Whatsapp Channel |
दुर्गापूर आणि उर्जानगर ग्रामपंचायत बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात येतात. या दोन्ही ठिकाणी मुनगंटीवार यांनी कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली आहेत. उर्जानगर कॉलनीत इमारतींचे दुरुस्तीकरण व इतर कामांसाठी सुधीर मुनगंटीवार यांनी वित्तमंत्री असताना 100 कोटी रुपये मंजूर केले होते.
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल आणि इतर सुरक्षा रक्षकांची व्यवस्था असूनही येथील कर्मचाऱ्यांच्या पगारात नक्षल भत्ता त्यांनी मिळवून दिला आहे. वेकोली पद्मापुर चेकपोस्टपासून एस.टी वर्क शॉपपर्यंत सुमारे चार कि.मी. ताडोबा मार्गाचे रुंदीकरण, फुटपाथची निर्मिती, डिव्हायडरवर झाडे लावणे, लाईट लावणे अशा अनेक टप्प्यांत 50 कोटींहून अधिक कामे केल्या गेली.
उर्जानगर ग्रामपंचायतच्या वॉर्ड नं. एकच्या समतानगरमध्ये नऊ कोटींचे जलशुद्धिकरण केंद्र आणि पाईप लाईन टाकण्यात खर्च केले गेले. केसरीनंदन नगरमध्ये एक सभागृह, ओपन स्पेसला तार कंपाऊंड, एक ओपन स्पेस विकसित करणे, आयुषनगरमध्ये ओपन स्पेस विकसित करणे, ताडोबा रोडपासून चेकपोस्टपर्यंतचे कंक्रीटकरण, कोंडीमध्ये ठाण्यापासून वस्तीतल्या शेवटपर्यंत उत्तम कांक्रीट रस्ता आणि पेवर ब्लॉक लावणे अशा अनेक मोठ्या निधीतून कामे करवली गेली.
दुर्गापूर ग्रामपंचायतच्या वॉर्ड नं. तीनच्या मालकी हक्क असलेल्या 22 एकर जमिनीवर बांधलेल्या शेकडो घरांना रिकामी करण्याचे आदेश झाले होते. न्यायालय आदेश असूनही सुधीर मुनगंटीवार यांनी विविध डावपेच वापरून त्या वस्तीतल्या शेकडो कुटुंबांच्या घरांना वाचवण्यासाठी न्यायालयांतून खटले जिंकलेल्या जमिनीच्या मालकांना 19 कोटी 54 लाख रुपये सरकारी निधी दिली.जेणेकरून शेकडो घरं तुटण्यापासून वाचवता येईल. 10 कोटी रुपये निधीने जलशुद्धिकरण केंद्राचे काम प्रगतीपथावर आहे. सामुदायिक भवन, अंगणवाडी शाळांचे अनेक कामे, अर्धा डझनाहून अधिक आरओ फिल्टर बसवले गेले. अनेक हाईमास बसवले गेले.
एक तृतीयांश मिळाले मतं…
या क्षेत्रातून सुधीर मुनगंटीवार गेल्या 14 वर्षांपासून आमदार आणि 6 वर्ष पालकमंत्री असल्याने जवळपास सर्व लोक त्यांना चांगले ओळखतात. तर नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांना फार कमी लोक ओळखतात. तरीही त्यांना अधिक मतं मिळाली. उर्जानगर आणि दुर्गापूर दोन्ही ग्रामपंचायतांमध्ये एकूण 39 बूथ आहेत. या बूथमधून काँग्रेसच्या धानोरकर यांना 9876 मतं मिळाली, तर भाजपच्या मुनगंटीवार यांना फक्त 3548 मतं मिळाली. भाजपच्या मतांच्या तुलनेत काँग्रेसला जवळजवळ तिप्पट मतं मिळाली.