महावितरणच्या कर्मचाऱ्याला विद्युत खांबाला बांधून त्याला मारहाण करण्यात आली. या घटनेच्या व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओ बघितल्यावर हा महाराष्ट्रच आहे की बिहार असा प्रश्न निर्माण होईल. व्हिडिओ बघितल्यावर शांत व्यक्तीचा पारा भडकेल. मारहाण करणारा सरपंच पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे विश्वासू असलेले देवराव भोंगळे यांचा खंदा कार्यकर्ता असल्याची माहिती आहे. महावितरणच्या त्या पीडित कर्मचाऱ्यांने पोलिसात तक्रार नोंदवली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी कारवाई सुद्धा केली आहे. महाराष्ट्राला खाली मान घालायला लावलेल्या या घटनेवर मुनगंटीवार काय निर्णय घेतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
Whatsapp Channel |
काय आहे घटना…
घुग्घुस महावितरणचा कर्मचारी सुरज परचाके यांच्याकडे उसगाव आणि नकोडा या गावाचा प्रभार आहे. नेहमी प्रमाणे परचाके उसगावला निघाले होते. मार्गात नकोडा येथील सरपंच किरण बंदुरकर यांनी त्यांना एसीसी सिमेंट कंपनी जवळ अडवीलं. बंदुरकर म्हणाले की डीपी जवळ काम आहे, नकोड्याला चला. नकोड्याला गेल्यावर त्यांनी मला माझ्याच दुपट्ट्याने विद्युत खांबाला बांधलं. गावाकऱ्यांना गोळा केलं. साधारणता दोन तास त्यांनी बांधून ठेवलं. घुग्घुस महावितरणचे सहायक अभियंता नयन भटारकर यांना भ्रमणध्वनीने माहिती दिली. भटारकर यांनी घटनास्थळी जाऊन परचाके यांना सोडविले. त्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला धाव घेतली. तक्रारीवरून सरपंचावर विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास घुग्घुस पोलीस करीत आहेत.
भाऊ कार्यकर्त्यांना आवरा…
नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत सुधीर मुनगंटीवार यांच्या दोन लाख साठ हजार मतांनी पराभव झाला. हा पराभव मुनगंटीवार यांच्या कार्यकर्त्यांना पचनी पडलेला नाही. कार्यकर्ते नको ते चाळे करत सुटले आहेत. केवळ गावकऱ्यांपुढे हिरोगिरी करण्याच्या संकुचित मानसिकतेतून सरपंचांनी हा प्रकार घडवला अशी टीका आता होत आहे. अशा गुंड प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांना मुनगंटीवार वेसण घालतील काय? असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.