गत लोकसभा निवडणुकीत कांग्रेस उमेदवारीचे महानाट्य भयंकर बंगल्याचे संपूर्ण जिल्ह्याने बघीतले आहेच. चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात कांग्रेस अंतर्गत वरीष्ठ नेत्यांच्या ‘लाथाळया’ संपलेल्या नाहीत याची अनूभूती अनेकांना आली.
Whatsapp Channel |
आता विधानसभा निवडणुकीत तरी योग्य समन्वय साधून बल्लारपूर विधानसभे करीता उमेदवारीवर एकमत होईल की पुन्हा तोच प़कार इथे घडेल यावर मात्र चर्चा सुरू झालेल्या दिसतात. गत लोकसभा निवडणुकीत खा. श्रीमती धानोरकर यांना मदत करणारे अनेकजण आता मात्र विधानसभेकरीता रांगेत आहेत. दुसरीकडे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे कडवे समर्थक, माजी जि.प. अध्यक्ष व चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत पुणं ताकदीने मैदानात उतरले आहेत. मैडम आता पॉवरफुल आहेत. या विधानसभा क्षेत्रात उमेदवारी देण्यात त्यांचे मोठे योगदान राहणार आहेच. ना. वडेटटीवार रावतांकरीता आग़ही राहतीलच यात शंका नसलीतरी खासदार मैडम अनेक इच्छुकांच्या भाऊगर्दीत रावतांकरीता किती सकारात्मक राहतील? यावरही चर्चा सुरू झालेल्या दिसतात.
महाविकास आघाडीत अनेक पक्ष असले तरी बल्लारपूर विधानसभा परंपरेनुसार कांग्रेस च्या वाट्याला जाईल हे जवळपास निश्चित समजले जाते. लोकसभा निवडणुकीत
ना. सुधिरभाऊ मुनगंटीवार ४९००० मतांनी या विधानसभा क्षेत्रात पिछाडीवर राहिल्याने सहज क्षेत्र म्हणून कांग्रेस जणांच्या तोंडाला पाणी सुटणे स्वाभाविक असल्याने या विधानसभा क्षेत्राकरीता संतोष रावत यांचेसह माजी जि.प. अध्यक्ष प़काश पाटील मारकवार, माजी जि.प. उपाध्यक्ष तथा दिवंगत बाळूभाऊ धानोरकर यांचे कट्टर समर्थक विनोद अहिरकर, बहुजनांचा चेहरा म्हणून परिचीत असलेल्या डॉ. अभिलाषा गावतूरे, जेष्ठ कांग्रेसी घनश्याम मुलचंदानी, उलगुलान चे संस्थापक राजू झोडे अशी मोठी मंडळी उमेदवारी साठी रांगेत आहे. या मंडळीनी गत लोकसभा निवडणुकीत खा. धानोरकरांच्या विजयाकरीता मेहनत सुद्धा घेतली आहे हे विशेष. उमेदवारांची निवड दिल्लीतून होईल असे जरी सांगितले जात असले तरी हा विधानसभा क्षेत्र विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार व खासदार धानोरकर यांचेकरीता प़तिष्टेचा समजला जातो. यात आता कशी “दिलजमाई” होते याकडे साऱ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत.
सुरू झाला घटकपक्षांचाही “फोकस”
दिवाळीच्या तोंडावर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार असले तरी बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात उमेदवारीसाठी अनेकांनी तुणतुणे वाजवीणे सुरू केल्याचे चित्र भडकपणे महाविकास आघाडीत जाणवत आहे. गत लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवारानी दस्तुरखुद्द ना. सुधिरभाऊ मुनगंटीवार यांच्या दणदणीत पराभव केल्याने कांग्रेसमधील अनेकांच्या तोंडाला उमेदवारीसाठी पाणी सुटले असून डझनभर तरी उमेदवारीसाठी
उड्या मारताना दिसतात.
महाविकास आघाडीत घटकपक्ष असलेल्या शिवसेना (उबाठा) व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ची मंडळीसुद्धा मोठ्या स्तरावर फोकस मारताना दिसू लागली आहे. शिवसेना जिल्हा अध्यक्ष संदीप गिऱ्हे अनेक महिन्यांपासून या क्षेत्रात तळ ठोकून व अनेक उपक़मातून स्वताला फोकस करू लागल्याचे बघायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हातील जेष्ठ नेते राजेंद्र वैद्य यांच्या चकरा सुद्धा या क्षेत्रात वाढल्या आहेत.
उमेदवारीसाठी अनेकांच्या उड्या सुरू झाल्याने या क्षेत्रात महाविकास आघाडीच्या नेत्यांना नाकी नऊ येणार यात शंका उरलेली दिसत नसल्याचे बोलले जात आहे. परंपरेनुसार बल्लारपूर विधानसभा क्षेत्र कांग्रेस च्या वाट्याला जाण्याची शक्यता जास्त आहे. ही बाब कांग्रेस जणांसाठी आनंदाची असली तरी मात्र कांग्रेस अंतर्गत उमेदवारीसाठी फिल्डींग लावणाऱ्या ची संख्या फार मोठी असल्याने व यात विरोधी पक्ष नेते व खासदार गट समोर समोर आल्यास अगदी शेवट पावेते इथल्या उमेदवारीचा तिढा सुटण्याची शक्यता दिसत नाही. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचेसाठी ही जागा अत्यंत प्रतिष्टेची असल्याने व खासदार श्रीमती धानोरकर यांचेसाठी “आणि” “बाण” “शान” असल्याने कांग्रेस अंतर्गत मोठी रस्सीखेच अपेक्षित आहेत. कारण राजकीय पुवंग़ह लक्षात घेता दोघांचेही एका नावावर एकमत होणे तेवढे सहज नसल्याचे बोलले जाते. अन् झालेही तरी काहीतरी समझोता करावा लागेल हे गुहीत धरले जात आहे.
बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत उमेदवारी साठी रस्सीखेच सुरू असलेल्या उमेदवारांची माळ कुणाच्या गळ्यात पडेल हे आताच सांगता येणार नाही, चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर विधानसभा क्षेत्र हा महाराष्ट्रात सर्वांचे लक्ष लागून असलेला आहे. गत लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार ना. सुधिर भाऊ मुनगंटीवार यांना आपल्या क्षेत्रात विकासाची कामे करूनही बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात ४९ हजार मतांनी लोकसभेत पराभव स्वीकारावा लागला होता हे विशेष. याच पावतीवर महाविकास आघाडीत उमेदवारी साठी रस्सीखेच सुरू असलेल्यांची उमेदवारीसाठी भटकंती दिसून येत आहे. गावा गावात जाऊन जनतेसमोर आपलीच उमेदवारी पक्की असल्याचे निदर्शनास आणून देण्यात सध्या डझनभर तरी मंडळी व्यस्त आहे. विधानसभा निवडणुकीची उमेदवारी दिल्लीतून निश्चित होईल अशी अमरावती येथे काँग्रेस कमिटी मिटिंगमध्ये पदाधिकारी बोलल्याचे सांगितलेजाते. येता बल्लारपूर विधानसभा निवडणुकीत उमेदवारी कुणाच्या गळ्यात पडेल हे विरोधी पक्षनेते विजय भाऊ वट्टेटीवार, व खासदार प्रतिभाताई धानोरकर सहजपणे सांगतील का? याकडे साऱ्यांचेच लक्ष आहे.