राजकारणाची दुकान चालावी म्हणून विवेक बोढे ने ठेवलेला रोजंदार शिक्षक गायब
घुग्घुस (चंद्रपूर) : भारतीय जनता (BJP) पक्षाचा युवा मोर्चे चा प्रदेश उपाध्यक्ष (Yuva Morcha State Vice President) विवेक बोढे (Vivek Bode) यांनी अापल्या राजकारणाची दुकान चालत रहावी या साठी आपल्याच शिक्षकी पदा वर ठेवलेला रोजंदार युवक शुभम कोयडवार शेवटी आज बुधवारला शाळेत फिरकलाच नाही. विशेष म्हणजे घुग्घुसच्या श्रीराम वार्ड येथील रहिवासी शुभम अशोक कोयडवार (Shubham Ashok Koydwar) नावाचा हा युवक शिक्षकी पेशेसाठी प्रशिक्षित नसतांना आणि (Sakharwahi) साखरवाही च्या जनता शाळेत (Janta School) नियुक्त नसतांना देखिल काल दुपारच्या सुमारास विद्यार्थांना 9वीं वर्गाला (9th Class) रुम नंबर 2 मध्ये शिकवत असतांना आडळला. पण जेव्हा त्याची चौकशी करत प्रश्न विचारण्यात आले तर तो तेव्हाच पळून गेला आणि आज तो या शाळेत परतलाच नाही.
Whatsapp Channel |
हा गंभीर प्रकार ” चंद्रपूर तक “ पोर्टल मधे मंगळवारी उघडकीस आल्यानंतर आता तरी शिक्षण विभाग जागा होवून या गुह्या कड़े लक्ष्य देईल काय, हा प्रश्न सामान्य जनतें कडून विचारण्यात येत आहे.
या संदर्भात चांदा शिक्षक प्रसारक मंडळाकडून संचालित जनता विद्यालय साखरवाहीच्या मुख्याध्यापिका वी. एस. पेटकर यांच्याशी या बाबत विचारणा केली असता त्यांनी कुठल्याच प्रश्नांची उत्तरे दिली नाही. या उलट शुभम कोयडवारला त्या कम्प्यूटर शिक्षक म्हणून रूजू असल्याचे सांगितले. जेव्हा की हा रोजंदार शिक्षक शुभम 9वीं च्या वर्गात इंग्रजी (English) शिकवित असल्याची धक्कादायक बाब समोर आली है। मुख्याध्यापिका या खोटे बोलत असल्याचे निदर्शनास येताच 9वीं वर्गाचे अवलोकन केले असता तिथे एक ही कम्प्यूटर नव्हते.
BJP युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे “महा फ्रॉड शिक्षक”.
भारतीय जनता पक्षाचा युवा मोर्चे चा प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांचा भिंग फूटल्याचे निदर्शनास येताच ते आज दुपारी 1 वाजेच्या सुमारास तडकाफड़की ने शाळेत हजर झाले. त्यांच्या शिकवणी वर्गास शिकविणारा शुभम कोयडवार गायब असल्याने आणि विवेक बोढे अचानक हजर झाल्याने विद्यार्थांची ताराबंळ उडाली. अनेक दिवसानंतर अचानक विवेक बोढे चे इतर शिक्षकांना दर्शन झाल्याने ते देखिल आश्चर्य चकित दिसत होते. भाजप आणि राजकारणात सतत सक्रिय असणारे विवेक बोढे हे एखाद्या लोकप्रतिनिधी सारखे शाळेत अवतरल्याने त्यांना बघण्यासाठी विद्यार्थी देखिल कुतूहलाने त्यांच्याकडे बघत होते. एरवी थाटात वागणारे विवेक बोढे आपण काही ही चूक केली नाही, या तोर्यात स्पष्टीकरण देत फिरत दिसले. #chandrapurtak
राजकारणासाठी शिक्षकाची अशी ही ” विवेक ” बुद्धी