Ajay Pimpalshede, a BJP supporter from Singapore, conducts vigorous campaign for Mahayuti candidate Shweta Mahale in Chikhli”
Whatsapp Channel |
चिखली विधानसभेतील भारतीय जनता पार्टीच्या महायुतीचे अधिकृत उमेदवार सौ. श्वेता विद्याधर महाले यांच्या प्रचारासाठी जगभरातील समर्थकांनी सहभाग घेतला आहे. विशेष म्हणजे, सिंगापूरमधून भाजपा समर्थक अजय आन्याजी पिंपळशेडे यांनी थेट प्रचाराची जबाबदारी घेतली आहे.
अजय पिंपळशेडे यांनी सिंगापूरहून विविध माध्यमांतून प्रचार सुरू केला असून, ते सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून चिखलीतील मतदारांपर्यंत महायुतीचे धोरण, विचार आणि सौ. श्वेता महाले यांची कामगिरी पोहोचवत आहेत. या प्रकारच्या आंतरराष्ट्रीय प्रचारामुळे उमेदवाराला जागतिक स्तरावर पाठिंबा मिळत असल्याचे दिसून येत आहे.
सौ. श्वेता महाले यांचा प्रचार सध्या जोरात सुरू असून, स्थानिक पातळीवरील प्रचारासोबतच देश-विदेशातील भाजपा समर्थकांकडूनही मोठा प्रतिसाद मिळत आहे. सिंगापूरहून केलेला हा प्रचार एक उदाहरण असून, यामुळे चिखली विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मोठा फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.