चंद्रपूर : सिव्हील ड्रेस मध्ये खासगी वाहनात परिवारासोबत बसून असलेल्या ब्रम्हपुरीचे ठाणेदार यांनी ब्रम्हपुरी – आरमोरी राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे फाटकावर आलेल्या एका खासगी ट्रॅव्हला थांबण्यासाठी सांगितले. रेल्वे फाटक वर मागे पुढे असलेल्या वाहनाच्या रांग लक्षात घेता ट्रॅव्हल चालकाने ट्रॅव्हल रेल्वे फाटक वर थांबवली नाही. ट्रॅव्हल्स न थांबल्याने चिडून जाऊन ठानेदारानी ट्रॅव्हल चा पाठलाग करून ख्रिस्तानंद हॉस्पिटल चौक मध्ये थांबाऊन बेदम मारहाण केल्याची घटना 26 नोव्हेंबर ला सायंकाळी चारच्या दरम्यान घडली.
Whatsapp Channel |
मोहन अडविकर हे एम एच 49 ए टी 3625 या ट्रॅव्हल वर ड्रायव्हर असून ते रोज गडचिरोली ते नागपूर खाजगी बस चालविण्याचे काम करतात. नेहमी प्रमाणे ते ट्रॅव्हल क्र. (एम एच 49 ए टी 3625) घेऊन नागपूर कडे जात असताना 26 नोव्हेंबर ला सायंकाळी चारच्या दरम्यान ब्रम्हपुरी येथील रेल्वे क्रॉसिंग जवळ रेल्वे गेट पडल्याने ट्रॅव्हल उभी केली होती. गेट उघडल्याने ट्रॅव्हल समोर घेत असतांना मालडोंगरी रोड कडून एक खाजगी कार क्र एम एच 29 एआर 8855 रॉंग साईड ने येऊन त्यातील एका व्यक्ती रेल्वे लाईन च्या मधात ट्रॅव्हल थांबविण्याचा इशारा केला. ती रेल्वे लाईन असल्याने व गेट उघडल्याने माझ्या ट्रॅव्हल च्या मागे अनेक वाहने असल्याने ट्रॅव्हल थांबविली नाही व सरळ ब्रम्हपुरी येथील ख्रिस्तानंद चौक येथे चालक घेऊन आला. मागेच ती कार पाठलाग करत आली आणि ती व्यक्ती त्या वाहनातून उतरून चालकाला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करू लागला. शिवीगाळ करणारी व्यक्ती ब्रम्हपुरी येथील पोलीस निरीक्षक आहे म्हणून चालकाला माहित नव्हती. पोलिसांच्या वाहनात नसल्याने त्यांना ओळखता आले नाही, परंतु काही क्षणात एक वाहतूक शिपाई ड्रेस वर त्या ठिकाणी आला असता संबधित गैर अर्जदार व्यक्तीने वाहतूक हवालदार च्या हातातील लाठी घेऊन ट्रॅव्हल्स चालकाच्या डोक्यावर काठीने बेदम मारहाण करून रक्त बंबाळ केल्याची तक्रार ट्रॅव्हल चालकाने नोंदविली आहे. (Bramhapuri Police Inspector Sudhakar Ambore brutally beat up the travel driver at Christanand Hospital Chowk: Video Viral)
ट्रॅव्हल्स चालकला बेदम मारहाण केल्यानंतर रक्तबंबळ चालक उपचार करण्यासाठी विनवणी करीत असताना सिविल ड्रेस वर असलेल्या व स्वतःला ठानेदार म्हणणाऱ्या व्यक्तीने त्याला ट्रॅव्हल्स चालवायला लावून ट्रॅव्हल्स ठाण्यात येण्यास बाध्य केले. ठाण्यामध्ये गेले असता मला दवाखान्यात नेऊन मेडिकल चेकअप झाल्यावर पुन्हा ठाण्यामध्ये आणून कोऱ्या कागदावर सह्या घेऊन काही लिखाण केलेल्या कागदावर जबरन सह्या घेतल्या. चालकाने रिपोर्ट लिहून घ्यावे म्हणून विनंती केल्यानंतर ही तक्रार न लिहिता रात्री अकरा वाजता पर्यंत बसवून ठेवले. उलट तक्रार पोलिस स्टेशनमध्ये दाखल न करता वरिष्ठांकडे करण्याचा उरफाटा सल्ला दिल्याचे त्यांनी म्हटले आहे.
ट्रॅव्हल चालकाची कोणतीही चूक नसताना अश्लील शिवीगाळ करून भर चौकात मला बेदम मारहाण करून गंभीर जखमी केलेल्या ठाणेदारावर कारवाई करून न्याय देण्याची मागणी तक्रारीतून ट्रॅव्हल्स चालक मोहन अडविकर यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांना उपविभागीय पोलिस अधिकारी ब्रम्हपुरी यांचे मार्फत पाठविलेल्या तक्रारीत केली आहे. तसेच पालकमंत्री नाम सुधीर मुनगंटीवार , विरोधी पक्षनेते ब्रम्हपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांनाही निवेदाद्वारे मागणी केली आहे.