दहा वर्ष सत्तेत असलेल्या भाजपला 2024 मध्येही सत्ता हवी आहे. ‘अब की बार, चारसो पार’ हा नारा भाजपने दिला. सत्तेसाठी पक्ष फोडाफोडीचे राजकारण केलं. मात्र देशातील सध्याचे वातावरण भाजपला फार पोषक नाही. दिल्ली ते गल्लीतील महायुतीच्या उमेदवारांना विजयासाठी मोठी कसरत करावी लागतं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचाराच्या नारड चंद्रपुरातून फोडला. काँग्रेसमुक्त महाराष्ट्र होण्यापासून चंद्रपूर लोकसभेने काँग्रेसला वाचवलं. त्यामुळेच की काय हा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी भाजप पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरला आहे. महाविकास आघाडीच्या प्रतिभा धानोरकर यांनी भाजपला पुरतं घामेजून सोडलं आहे.
Whatsapp Channel |
रोज नवा डाव भाजप टाकत असला तरी, भाजपच्याच माथ्यावर डाव उलटत आहे. अशा स्थितीत भाजपची डोकेदुखी वाढवणारी बातमी पुढे आली. पर्यावरणाच्या क्षेत्रात मोठं नाव असलेले बंडू धोतरे काँग्रेसवासी झालेत. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुभाष धोटे यांच्या उपस्थितीत बंडू धोतरे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. केवळ पर्यावरणच नाही तर, सामाजिक क्षेत्रात, ऐतिहासिक वास्तू संवर्धनात धोतरे यांचे नाव मोठे आहे. धोतरे काँग्रेसवासी झाल्याने भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.
कोण आहेत बंडू धोतरे…
केवळ चंद्रपूर जिल्हातच नव्हे तर देश पातळीवर धोतरे यांची ओळख आहे. चंद्रपूरातील किल्ला संवर्धनाच्या उपक्रमाची दखल थेट (Prime Minister Narendra Modi’s ‘Mann Ki Baat’) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मधून घेतली. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते धोतरे यांना राष्ट्रीय युवा पुरस्कार प्रधान करण्यात आला होता. जल प्रदूषण, वायू प्रदूषणावर नेहमीच आवाज उठवीत आले आहेत. शेकडो पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. Rahul Gandhi यांच्या भारत जोडो यात्रेत धोतरे यांनी सहभाग घेतला होता.
जिल्ह्यात धोतरे यांचा मोठा जनसंपर्क आहे. त्यांना मानणारा वर्ग आहे. त्यामुळे धोतरे यांच्या प्रवेशाने काँग्रेसला बळ मिळाल आहे.