कोठारी पोलीसांनी काल रात्रीच्या सुमारास हि कार्यवाही केली
चंद्रपुरात लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा पारा चांगलाच चढला आहे. अशात आता कोठारीतून एक बातमी समोर येत आहे. भाजपचे नेते देवराव भोंगळे यांचा साळा आशिष मोरे याला दारूची वाहतूक करतांना पोलीसांनी पकडले आहे. काल रात्रीच्या सुमारास कोठारी पोलीसांनी हि कार्यवाही केली. याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. चंद्रपुरात प्रचाराच्या अंतीम टप्प्यात दारूचा मुद्दा चांगलाच चर्चील्या जात आहे. भाजपच्या चित्रा वाघ यांनी दारूचा मुददा घेत प्रतिभा धानोरकरांना धारेवर धरले होते
Whatsapp Channel |
निवडणुकीला काही तास उरले आहेत. अशात पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आहे. काल रात्रीच्या सुमारास कोठारी येथे नाकाबंदी सुरू होती. यावेळी महिंद्रा बोलेरो वाहन क्रमांक MH34 AM 3709 याची तपासणी केली असता त्यात इंग्रजी दारूच्या 38 नग आढळून आले. वाहनासह चार लक्ष सहा हजार 990 रूपयाचा मुददेमाल मिळून आल्याचे पोलीसांनी सांगितले. याप्रकरणी कोठारी पोलीसांनी आशिष मोरे रा.तोहेागाव याच्यावर गुन्हा नोंद केला आहे. आशिष मोरे हा भाजप नेते देवराव भोंगळे यांचा साळा आहे. याप्रकरणाची आता एकच एक चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे.