मतदान काही तासावर आलेलं असताना भाजपाकडून मतदारांना प्रलोभन देत असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. औद्योगिक शहर अशी ओळख असलेल्या घुग्घुस मध्ये हा प्रकार घडला आहे.
मतदारांना कुपन वाटल्या जात आहे. या कुपनवर व्यक्तिगत माहिती लिहिली जात असून ‘भाऊ’ विजयी झाल्यास आकर्षक बक्षीस आपल्या पर्यंत पोहचविल्या जाईल असे सांगण्यात येत आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे. या प्रकारामुळे आचारसंहितेचा भंग होत आहे. त्यामुळे कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी दीप्ति सोनटक्के, रोशन पचारे यांनी केली आहे.
