उमेदवारी जाहीर झाल्यावर आमदार प्रतिभा धानोरकर या नागपूर विमानतळावर आल्या होत्या. आपल्या मुलाला कवेत त्यांनी घेतले तेव्हा त्यांचा डोळ्यातून अश्रू बाहेर आले होते. यावर मुनगंटीवार यांनी मंगळवारला झालेल्या सभेत टिप्पणी केली. डोळ्यातील अश्रू बघून फक्त सहनुभितीवर मतदान कराल तर तुमच्या डोळ्यात पाच वर्ष तुमचा डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. मी तुम्हाला सतर्क करतोय ‘. असा इशारा मुनगंटीवार यांनी मतदारांना दिला होता.
Whatsapp Channel |
यावर धानोरकर यांना प्रश्न केला असता त्या म्हणाल्या,या दहा महिन्यात काळात मी जो संघर्ष केला आहे. कदाचित त्यांना माहिती नसावी. मात्र राजकारणात रमलेल्या व्यक्तीने असे वक्तव्य करायला नको होते. यावर मला जे बोलायचे आहे ते सभेत बोलणार असं धानोरकर म्हणाल्यात.
Leave a comment
Leave a comment
Welcome Back!