इमारती उभ्या केल्यात, बगीचे केलेत, बांधल्या छत कोसळणारे बस स्थानकही केलेत. यांच्या सामान्य माणसांना काय उपयोग? बापाचा खांद्याला खांदा लावून दोन दोन मुलं खाणारे आहेत. या मुलांचा हातांना रोजगार नाही. इमारती बाग बगीचे उभे केल्याने पोटाची भूक भागत नाही. भूक भागाविण्यासाठी अन्नाचा दाना लागतोय. त्यासाठी रोजगार हवाय. या गंभीर विषयावर तुम्ही काय केलंत? असा सवाल महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी उपस्थित केला. चंद्रपुरात रविवारी कन्हैया कुमार यांची सभा होती. त्या सभेत धानोरकर बोलत होत्या.
Whatsapp Channel |
महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्यावर धानोरकर यांनी चौफेर टीका केली. मी तुमच्यासारखं तीस, चाळीस वर्षाचं राजकारण केलं नसलं, तरी विस हजार कोटींचा प्रकल्प माझ्या मतदार संघात मंजूर करून दाखविला आहे.त्यामुळेच मी मतदारांपुढे हक्काने उभी होते. 145 मेगा व्हाटचा प्रकल्प मी मंजूर केला. मी आणलेल्या प्रकल्पात दहा ते पंधरा हजार युवकांना रोजगार मिळणार आहे. त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाच्या प्रश्न मार्गी लागणार आहे.
केवळ अडीच वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं. उर्वरित दिवसात भाजपची सत्ता होती. सत्ता असताना भाजपने काय केलं, हे त्यांनी सांगायला हवं. उलट तेच विचारतात काँग्रेसने सत्तर वर्षात देशाला काय दिलं. भाजपचे कार्यकर्ते आपली बाजू मांडत असताना पाच रुपयाच्या बिस्किट पुडा देऊन त्याची जाहिरात मात्र मोठी करतात. आपल्या लोकांना ते करता येत नाही. पन्नास हजाराची मदत दिली असतानाही आमच्या कार्यकर्त्यांना त्याच्या गवगवा करता येत नाही. काम कमी असलं तरी चालेल मात्र भाजपा सरकार पोपोगंडा करायला शिका, असे आव्हान प्रतिभा धानोरकर यांनी कार्यकर्त्यांना केला. या सभेत हजारोच्या संख्येने जनता उपस्थित होती. धानोरकर यांनी महायुतीवर सडकून टीका केली.