चंद्रपूर लोकसभा क्षेत्राकरीता १५ उमेदवारांचे नामांकन वैद्ध ठरले आहेत. नामांकन परत घेण्याचा आजचा शेवटचा दिवस. किती रिंगणात राहतील हे आज कळेल. सध्या पुढील 20 दिवसाचे नियोजन करण्यात उमेदवार व्यस्त असले तरी खास करून जिल्यातील दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांनी रणधुमाळी सांभाळल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. काही प्याद्यांची शोशल मिडियावर एवढी फटकेबाजी सुरू आहे की विचारता सोय नाही. स्वताच उमेदवार असल्याच्या तोऱ्यात विपुल ज्ञान असल्यागत शोशलमिडीयासमोर येणारी ही मंडळी बघून जाणकार म्हणतात ‘चहापेक्षा केटली गरम…!’
Whatsapp Channel |
खासकरून हा प्रकार भा.ज.पा. व कांग्रेस कंपूमध्ये बघावयास मिळत आहे. उमेदवारांकडून निवडणुकीत आरोप होतच असतात. अनेकदा बिनबुडाचे आरोपही होतात. विशेषता राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारानी पुढे येऊन आरोप खोडावेत अशी मतदारांची अपेक्षा, मात्र या लोकसभा निवडणुकीत पिलांटू मंडळी घरबसल्या शोशल मिडीयावर उमेदवारांच्या आधी स्वता व्यक्त होऊन ताळमेळ नसलेले खुलासे सादर करू लागल्याचे भयानक चित्र बघायला मिळत आहे. राजकारणावर भाष्य करणारे अनेक ग्रुप सध्या जोमात आहेत.याशिवाय स्थानिक स्तरावरअनेक हौशी राजकिय अंदाज व्यक्त करण्याच्या स्पधैत उतरून डायरेक्ट राष्ट्र व राज्यस्तरावरील नेत्यांनाच लक्ष करू लागल्याने ‘ चहापेक्षा केटली गरम…!’ झाल्याची चर्चा होत आहे.
लोकसभेत मोठय़ा राष्ट्रीय पक्षाची उमेदवारी मिळविणारे उमेदवार परीपक्व, स्थानिक परिस्थितिचा अभ्यास असणारे, आरोपांना प्रतुत्तर देण्यात सक्षम, पक्षाच्या ध्येयधोरणांशी सुसंगत अशी सुज्ञ मतदारांची अपेक्षावजा कल्पना असते. उमेदवारांचे हस्तक मात्र आपली राजकिय पोळी शेकण्याकरीता लगीनघाईने पुढे येऊन शोशल मिडीयावर किवा मिडीयावर व्यक्त होऊ लागल्याने राजकिय विष्लेषक म्हणू लागलेत ‘ चहापेक्षा केटली गरम….!’
चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत राजकिय मंशा ठेवून अनेक दुसऱ्या व तिसऱ्या फळीतले नेते, कार्यकर्ते सर्वज्ञानी असल्यागत पुढे पुढे करतात. भविष्यात विधानसभा, जिल्हा परिषद, म.न.पा,न.प व प.स. निवडणुका अपेक्षीत आहेत. यात भा.ज.पा व कांग्रेस पक्षात इच्छुकांची भरमार असणार आहे. चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात ६ विधानसभा क्षेत्र येतात. त्यामुळे लोकसभा उमेदवारांसमोर अनेकांची चमकोगिरी अपेक्षीत आहे. मात्र ही मंडळी उमेदवारांवरील आरोपांचे खंडण ज्या जोशाने करू लागले आहेत ते बघता मतदार म्हणतात ‘चहापेक्षा केटली गरम. …!’
भा.ज.पा.उमेदवार ना.सुधिरभाऊ मुनगंटीवार व कांग्रेस उमेदवार आ. प्रतिभा धानोरकर यांनी एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप सुरू केले आहेत. घोडामैदान जसजसा पुढे सरकेल तसतसी आरोपांची तुंबळ सुरू होणार आहेच. दोन्ही पक्षात उमेदवारांशी जवळीक साधण्याकरीता व विरोधकांचे आरोप खोडायला उमेदवारांचे आधी टिम- बी तयार आहे. व जाणकारांचे मते ही टिम- बी ठरणार आहे ‘ चहापेक्षा केटली गरम…!’
कांग्रेस उमेदवार आ.प्रतिभा धानोरकर यांनी ‘कोविड-19’ महामारीला धरून ना.मुनगंटीवार यांना घेरण्याचा प्रयत्न करताच भा.ज.पा. टिम- बी मधून माजी जि.प.अध्यक्ष देवराव भोंगळे वार परतवायला लगीनघाईनं पुढे आले. देवराव भोंगळे भविष्यात भा.ज.पा.चे विधानसभा उमेदवारीकरीता इच्छुक असल्याचे बोलले जाते. कदाचीत यामुळेच “तिकिट कन्फर्मेशन” च्या आशेने महिला उमेदवाराच्या आरोपाचे उत्तर ना.मुनगंटीवार यांचेकडून अपेक्षित असताना देवराव भोंगळे यांना स्वतः उत्तर देण्याची लगीन घाई झाली का? असाही सवाल उपस्थित झालेला दिसतो. राजकीय मर्यादा निवडणूकीतही असतात याचा विसर होता कामा नये असे मतदारांना वाटते…
