निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, वरोरा-चंद्रपूर-बल्लारपूर टोलरोड लिमिटेड नावाच्या कंपनीने 20 नोव्हेंबर 2023 रोजी राजकीय पक्षाला 7 कोटी रुपयांचे देणगी देण्यासाठी प्रत्येकी 1 कोटी रुपयांचे एकूण 7 निवडणूक रोखे खरेदी केले आहेत. विशेष म्हणजे बल्लारपूरहून चंद्रपूर- वरोरामार्गे दिल्लीच्या नवीन संसदेत आणि अयोध्येतील श्री राम मंदिराच्या प्रवेशद्वारासाठी आणि फर्निचरसाठी लाकूड पाठवण्यात आले होते. भाजपला प्रत्येकी 1 कोटी रुपयांचे 5854 रोखे मिळाले आहेत.
Whatsapp Channel |
वरोरा-चंद्रपूर-बल्लारपूर टोल रोड लिमिटेड नावाची एक गैरसरकारी कंपनी, 30 ऑक्टोबर 2009 रोजी नोंदणीकृत झाली आहे. ही कंपनी विविध बांधकाम प्रकल्प घेत असते. 2021 मध्ये या कंपनीची अधिकृत घोषित मालमत्ता 177 कोटी रुपये होती. या कंपनीला IL & FS Transportation Networks Ltd. हे विश्वराज इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि दिवा मीडिया प्रायव्हेट लिमिटेडद्वारे ही कंपनी चालविली जाते. वरोरा-चंद्रपूर-बल्लारपूर -बामणी रस्ता, पूल व टोल इत्यादी चौपदरीकरणाचे दिल्या गेले होते. ईपीसी (अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम) कंत्राट विश्वराज इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला 688 कोटी रुपयांना देण्यात आले. या प्रकल्पामध्ये 257.88 कि.मी. लांबीच्या लेनचे बांधकाम करण्यात आले आहे. सवलत संपण्याची मुदत जानेवारी 2041 पर्यंत देण्यात आली आहे. त्यात 2 टोलनाक्यांचा समावेश आहे.
कौन आहे संचालक ? IL & FS Transportation Networks ltd या कंपनीचे मुख्य संचालक सी.एस.राजन, नंद किशोर, डॉ. राजीव ओबेराय, सुब्रत कुमार मित्र, डॉ. जगदीश नारायण सिंह व कौशिक मोडक आहेत. वरोरा-चंद्रपुर-बल्लारपुर टोल रोड लिमिटेड कंपनीचे संचालक राजेश केला, जयंत पाठक, शिल्पा अग्रवाल, सिद्धार्थ लखाने, अनुराग श्रीवास्तव व चंद्रमोहन अग्रवाल यांचा समावेश आहे. या कंपनी कार्यालयीन पता मधु-माधव टॉवर, लक्ष्मी भवन चौक, धरमपेठ, नागपुर असा लिहिला आहे.