Janta Vidyalaya’s struggle to save that fraud teacher
Whatsapp Channel |
शाळेने माहिती न दिल्याने राज्य माहिती आयुक्तांकडे अपील दाखल
चंद्रपुर : चांदा शिक्षण प्रसारक मंडळ (Chanda Shikshan Prasar Mandal) अंतर्गत जनता विद्यालय साखरवाही (Janta Vidyalay Sakharwahi) येथे सहाय्यक शिक्षकाने स्वतः शिकवणी न करता खाजगी माणूस ठेवून शिकवणी केल्याचा प्रकार केला. पालकांनी हा प्रकार उजेडात आण्याल्यानंतर त्या खाजगी व्यक्तीला हटविण्यात आहे. मात्र त्या सहायक शिक्षकावर अद्याप कारवाही करण्यात आलेली नाही. उलट प्रकरण दाबण्याचा जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
साखरवाही येथे कार्यरत सहाय्यक शिक्षक विवेक बोढे (Teacher Vivek Bodhe) हे भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे प्रदेशउपाध्यक्ष (State Vice President of Bharatiya Janata Party Yuva Morcha) व घुग्घूस अध्यक्ष आहेत. त्यांनी मुख्याध्यापिका वैशाली पेटकर (Principal Vaishali Petkar) यांना विश्वासात घेऊन स्वतः शिकवणी न करता एका खाजगी व्यक्तीची भाड्यावर ठेवले. व आपला वेळ राजकारणात वापरला. शाळेत शिक्षिका ऐवजी इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवणी करीत असताना या प्रकार पालकांनी उजेडात आणला. तसेच याप्रकरणाची पालकांनी काँग्रेस कार्यालयात तक्रार केली. त्यानंतर काँग्रेस नेते व पत्रकारानी संयुक्तपणे शाळेला भेट दिली असता नकली शिक्षक पळून गेला. आणि या प्रकरणाचा भांडाफोड झाला. यानंतर सत्ता पक्ष तसेच शिक्षण संस्था व मुख्याध्यापिका यांनी त्या शिक्षकांवर कारवाई करण्या ऐवजी सदर प्रकरण दाबण्यासाठी आपली पूर्ण शक्ती प्राणपणाला लावली आहे.
काँग्रेस (Congress) शहर अध्यक्ष राजूरेड्डी (Raju Reddy) यांनी दिनांक 17 जानेवारी 2022 रोजी माहिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये जनता विद्यालय साखरवाही शाळेत शिकविणाऱ्या शिक्षकांची नावे व पत्ता, शिक्षकांच्या हजेरी बुकाची सत्यप्रत, शिक्षकांची शिकवणी वेळेनुसार वेळापत्रक ही शाळेशी संबंधित माहिती मागितल. माहिती अधिकारी तथा मुख्याध्यापिका यांनी ही माहिती शाळेतील शिक्षकांची वैयक्तिक स्वरूपाची असल्याने व शाळेतील शिक्षकांनी त्यांची वैयक्तीक माहिती देण्यास लेखी संमती न दिल्यामुळे आपणास माहिती पुरवू शकत नाही असे उत्तर दिले आह.
वर्ष 2016 ते 2017 मध्ये ही साखरवाही शाळेने गोपाळ दिनाजी सातपुते (Gopal Dinaji Satpute) यांनी तत्कालीन मुख्याध्यापक व माहिती अधिकारी जगदीश बाबुराव मत्ते (Jagdish Baburao Matte) यांना शाळे संबंधित माहिती मागितली होती, त्यांना ही रेड्डी यांच्यासारखे समान उत्तर पाठविण्यात आले होते. त्यांनी याविरोधात अपील केली अपील अधिकाऱ्यांनी माहिती देण्यासाठी सुचविले असता होते. यावेळीही शालेय मुजोर प्रशासनाने माहिती दिली नाही. त्यामूळे या विरोधात राज्य माहिती आयुक्त दिलीप धारूरकर नागपूर खंडपीठ (State Information Commissioner Dilip Dharurkar Nagpur Bench) यांच्याकडे द्वितीय अपील दाखल केली आहे. या शिक्षण संस्थे विरोधात रेड्डी यांनी कडवी झुंज देण्याचा निर्णय करीत दिनांक 22 फेब्रुवारी रोजी प्रथम अपील दाखल केली आहे. #chandrapurtak