चंद्रपूर : खुर्ची सम्राट या मराठी सिनेमात विहीर चोरीला गेल्याचे कथानक दाखविल्या गेले. हा सिनेमा फारच गाजला होता. या मराठी सिनेमाची आठवण करून देणारा प्रकार घुग्घुस शहरातुन पुढे आला आहे. या शहरातील चक्क (Service Road) ‘सर्व्हिस रोड’ गायब झाला आहे. या प्रकाराची चर्चा सुरु असतानाच हा रोड गायब होण्यामागे राजकीय दबाव असल्याची चर्चा होते आहे.
Whatsapp Channel |
राज्य महामार्ग क्रमांक (7) सात हा चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या घुग्घुस शहराच्या मध्यभागातून जातो. हा महामार्ग यवतमाळ जिल्ह्यातील खरांजी गावापासून वणी मार्गे चंद्रपूरच्या पडोळीपर्यंत सुमारे 82 किलोमीटरचा (Four Lane) चौपदरी रस्ता आहे. 13 वर्षांपूर्वी 2011 मध्ये IVRCL नावाच्या कंपनीने 800 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून ते बांधले होते. तसेच नियमानुसार ज्या गावांमधून हा (Four Lane) चौपदरी रस्ता जातो तो 82 किलोमीटरच्या परिघातात आहे. त्या गावांतील स्थानिक नागरिकांच्या ये-जा करण्यासाठी सर्व्हिस रोड बांधणे बंधनकारक होते. मात्र शहरातून (Service Road) सर्व्हिस रोड गेलेला नाही. शहरात वेकोली कोळसा खाण, एसीसी सिमेंट, लॉयड्स मेटल अँड गुप्ता, भाटिया कोल वॉशरीज असे मोठे उद्योग आहेत. शहरातून दररोज हजारो लहान-मोठी अवजड वाहने ये-जा करतात. मुख्य महामार्गावर रुग्णालये, शाळा, महाविद्यालयेही आहेत.
हा (Four Lane) चौपदरी रस्ता चांदणी चौकातून उद्योगनगरीतील वेकोली वस्तीतून जातो. या मार्गावर शाळा, प्रियदर्शनी शाळा आहे. शहराच्या मध्यभागी असलेल्या चौपदरी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना सर्व्हिस रोड नसल्यामुळे शहरातील रहिवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. चौपदरी रस्ता तयार झाल्यापासून अनेक पादचाऱ्यांचे हाल झाले आहेत. अपघातात अनेक प्रवाशांनाही आपला जीव गमवावा लागला आहे.
घुग्घुस शहराचे नेते जिल्ह्यात लोकप्रिय असून दररोज शहरातील भाजप, काँग्रेस व इतर राजकीय पक्षांचे नेते विविध विकासकामांचे ढोल वाजवून हेडलाईन करण्यात व्यस्त आहेत, मात्र यासारख्या गंभीर प्रश्नावर एकही नेता बोलत नाही. शहरातील सर्व्हिस रोड बद्दल त्यांनी मौन का पाळले हे समजण्यापलीकडचे आहे.
नावाचीच औद्योगिक नगरी…
राज्यातील ही पहिलीच नगरपरिषद आहे जिची स्थापना होऊन तीन वर्षे झाली आहे. तरी अद्याप निवडणुका झालेल्या नाहीत. बांधकामाचा कालावधी पूर्ण होऊनही राजीव रतन चौकातील रेल्वे फाटकावर कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात येत असलेल्या उड्डाण पुलाचे काम दोन वर्षांपासून सुरूच आहे. तर दुसरीकडे शहराच्या काठावर बायपास रस्ता आहे पण तोही पूर्णपणे जीर्ण अवस्थेत आहे. येथील नेते केवळ विकासकामांचे ढोल वाजवत आहेत. याच मुख्य मार्गांवर वाढदिवस तथा राजकीय इव्हेंटचे बॅनर लावले जातात. मात्र शहरवासीयांना भेडसावणाऱ्या गंभीर समस्येकडे लक्ष दिले जात नाही, त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे…