चंद्रपूर-आर्णी लोकसभेचा क्षेत्राचा काँग्रेसच्या विजयी उमेदवार Pratibha Dhanorkar यांचा जाहीर सत्काराचा कार्यक्रम राजुरा येथे पार पडला. या सत्कार सोहळ्यात प्रतिभा धानोरकर यांनी भाजपला चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातून हद्दपार करण्याचा विडा उचलला आहे. धानोरकर म्हणाल्यात, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मी स्वतः विधानसभा क्षेत्राची उमेदवार म्हणून प्रचार करेल. माझ्या लोकसभा क्षेत्रातील सहा विधानसभा क्षेत्रात भाजपाचा सुपडा नाही साफ केला तर प्रतिभा धानोरकर नाव लावणार नाही. अशी गर्जना धानोरकर यांनी केली.
Whatsapp Channel |
आमदार धोटेना मंत्रीपद…
पुढे धानोरकर म्हणाल्यात, या क्षेत्राची खासदार म्हणून विधानसभेच्या तिकिटा मलाच वाटायचा आहेत. आमदारची तिकीट सुभाष धोटे यांना मी देईलचं. मात्र त्यांना मंत्री पद मिळेल यासाठी प्रयत्न करेल. मला तिकीट मिळू नये यासाठी माझ्या पक्षातील काहींनी प्रयत्न केला. आमदार सुभाष धोटे यांना सुपारी देण्याचा प्रयत्नही झाला. तुम्ही तिकीट घ्या जेणेकरून सुधीर मुनगंटीवार घरी बसल्या निवडून येतील अशी प्लानिंग केल्या गेली.
मात्र आमदार धोटे अमिषाला बळी पडले नाहीत. अगदी सुरवाती पासून माझ्या सोबतीला धोटे खंबीरपणे उभे होते. गडचिरोली जिल्हाला मंत्री पद मिळत असते. यावेळी चंद्रपूरला मंत्रीपद मिडेल यासाठी मी प्रयत्न करणार असं धानोरकर म्हणाल्यात.
https://x.com/Chandrapur_tak/status/1801214074560409840?s=19