Sonia Gandhi said, Rahul was very young then: MLA Pratibha Dhanorkar was encouraged by telling his struggle
Whatsapp Channel |
चंद्रपूर : मी अशा कठीण प्रसंगातून गेली आहे. राजीवचे निधन झाले तेव्हा राहूल तुमच्या मुलांपेक्षा राहूल छोटा होता. धीर सोडून नका. गांधी कुटुंबिय तुमच्या पाठीशी आहे, अशा शब्दात आमदार प्रतिभाताई धानोरकर (Pratibha Dhanorkar) यांचे ज्येष्ठ काँग्रेस नेत्या खासदार सोनिया गांधींनी (Sonia Gandhi) सात्वंन केले. मायेने जवळ घेतले. त्यावेळी आमदार धानोरकर गहीवरल्या आणि सोनिया गांधीचेही डोळे पाणावले. याप्रसंगी काँग्रेस नेते तथा माजी खासदार राहूल गांधी (Rahul Gandhi) उपस्थित होते.
राज्यातील कॉंग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर ( MP Balu Dhanorkar) यांचे महिनाभरापूर्वी निधन झाले. ते रुग्णालयात असताना आणि त्यांच्या निधनानंतर राहूल गांधी धानोरकर कुटुंबीयांच्या संपर्कात होते. त्यांना आज शुक्रवारला भेटीसाठी दिल्ली येथे बोलाविले. ज्येष्ठ काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या या भेटीत आमदार प्रतिभा धानोरकर, त्यांचे दोन्ही मुल मानस आणि पार्थ, भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर प्रवीण काकडे उपस्थित होते. याप्रसंगी राहूल गांधी यांचीही उपस्थिती होती. आमदार धानोरकर यांनी रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीचा सारा घटनाक्रम सांगितला. धानोरकरांच्या निधनानंतरची परिस्थिती कथन केली. त्यावेळी सोनिया गांधींनी त्यांच्यावरही अशीवेळ आली होती, याची आठवण करुन दिली. तुमच्या मुलांपेक्षाही तेव्हा राहूल लहान होते. मलाही खुप त्रास झाला, याची आठवण करुन दिली. आमदार धानोरकर आणि दोन्ही मुलांना मायेने जवळ घेतले.
गांधी कुटुंबिय तुमच्या नेहमी पाठीशी राहीली. कोणतीही अडचण आल्यास थेट संपर्क साधा, असे सांगितले. राहूल गांधींनी स्वीय सहाय्यकाचा आणि स्वतःचा भ्रमणध्वनी आमदार धानोरकरांना दिला. कोणतीही अडचण आल्यास थेट संपर्क साधण्यास सांगितले. मुल लहान आहे. राजकारण होतच राहील. त्यांची काळजी घ्या असा सल्लाही त्यांनी दिला. आमदार धानोरकरांना सोनिया गांधींना मायेने जवळ घेतले. तेव्हा त्यांचा बांध फुटला. गांधींचेही डोळे पाणावले. राज्यातील एकमेव खासदार असल्यामुळे धानोकरांचा सोनिया गांधीशी थेट संपर्क होता. त्या त्यांना नावानिशी ओळखत होत्या. आठ महिन्यांपूर्वीच धानोरकर दांम्पत्यांनी सोनिया गांधींची भेट घेतली होती. (Chandrapur tak)