वरोरा शहरात सध्या डेंगू, टायफॉईड, चिकनगुनिया यांसारख्या साथीच्या रोगांनी डोके वर काढले आहे. शहरातील अनेक नागरिक या आजारांच्या विळख्यात अडकले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. यामुळे नागरिकांना शारीरिक त्रासासोबतच आर्थिक बोजाही सहन करावा लागत आहे. या साथीच्या रोगांचा विळखा आणखी घट्ट होण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रशासनाने वेळीच कार्यवाही करावी, अशी मागणी डाॅ. चेतन खुटेमाटे यांनी केली आहे.
Whatsapp Channel |
शहरातील सब्जी मंडी परिसरासह अनेक भागांत अस्वच्छता आणि घाण पसरल्याने साथीच्या रोगांचा प्रसार वेगाने होत आहे. या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन, प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्या, अशी मागणी करण्यात आली आहे. स्वच्छतेवर भर देत, रोगांचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी सघन उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.
डाॅ. चेतन खुटेमाटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वरोरा नगर परिषदेला निवेदन देत आठ दिवसांत उपाययोजना न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
या निवेदनादरम्यान संदीप सोनेकर, पलाश मदकुंटवार, चेतन पारखी, रुतिक जिवतोडे, हर्षल सोमटकर, वेदांत चाफले, सतिश परचाके, उल्हास बोढे, संकेत गोहकार, चंद्रशेखर झाडे, आणि सोहेल भाई उपस्थित होते.
“Urgent Measures Required to Tackle Dengue and Epidemic Diseases in Warora City: Dr. Chetan Khutemate”