बाळू धानोरकर यांच्या मृत्यूनंतर अनेक जवाबदाऱ्या माझ्यावर आल्यात. या जवाबदाऱ्या पार पाडताना एखादया वेळेस डोळ्यात अश्रू आलेत तर काय चुकलं. माझ्या अश्रूचा जाहिररित्या अनादर केलात. या ठिकाणी तुझी बहीण, मुलगी असती तर असेच वक्तव्य केले असते काय ? असा घणाघात प्रतिभा धानोरकर यांनी केला.
Whatsapp Channel |
आज चंद्रपुरात महाविकास आघाडीची संकल्प सभा पार पडली. या सभेत त्या बोलत होत्या. पुढे धानोरकर म्हणाल्यात मी रडणारी नाही, लढणारी आहे. लाथ मारेल तिथे पाणी काढण्याची ताकद ठेवते. या सभेनिमित्याने उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पहिल्यांदाच वडेट्टीवार, धानोरकर एका मंचावर दिसलेत. तुम्हचा विजय निश्चित आहे. मी सांगतोय. मी जिकण्यासाठी मैदानात येतो, असे राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार म्हणालेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकार टीका केली. एकमताने धानोरकर यांना निवडणून द्यावे असे आव्हान पटोले यांनी यावेळी केले.
रमेशजी चेनीथल्ला, महाराष्ट्र प्रदेश निरीक्षक, मा.मुकुलजी वासनिक सरचिटणीस अखिल भारतीय काँग्रेस कमिटी, मा.नाना पटोले प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष काँग्रेस कमिटी, मा. विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेते महाराष्ट्र विधानसभा, सौ पल्लवी रेनके प्रदेश काँग्रेस अध्यक्षा VJNT सेल, यांच्या प्रमुख उपस्थितीत इंडिया आघाडीच्या अधिकृत उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्या प्रचारार्थ दिनांक 5 एप्रिल 2024 रोजी सकाळी 10.30 वाजता, इम्पेरियल पॅलेस बालाजी मंदिराजवळ, दाताळा रोड, चंद्रपूर येथे कार्यकर्ता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.