पुढील काही दिवस चंद्रपूर जिल्यात गारपिट,वादळासह पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने अंदाज व्यक्त केला आहे. गत तिन दिवसापासून इकडे सरी बरसणे सुरू
असल्याने पारा घसरला आहे. दुसरीकडे राजकिय तापमानात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आगमनापासून घसरण सुरु झाल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. गत 7 तारखेपावेतो गरमावलेले राजकिय तापमान अचानक नरमावल्याने ‘ यहॉ सब शांती शांती है’ म्हंटले जात आहे.
Whatsapp Channel |
चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील मतदारांचा ” पारा” मात्र 8 एप्रिल पासून चढला असल्याचे जाणवत आहे.आता वायफळ भाषणे थांबवा व मुददयाचे बोला अशी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष चेतावणी मतदार देत आहेत व यामुळे उमेदवार गार होऊ लागल्याचे बोलले जात आहे. विशेष करून सरळ लढत असलेल्या कांग्रेस व भा.ज.पा. उमेदवारांनी आता भावनिक भाषणे व
तावपुणँ आश्वासने बंद करावीत व ‘ मुद्दा’ घेऊनच मतदारांसमोर यावे अशी अपेक्षा पुढे येत आहे.
भा.ज.पा. उमेदवार ना. सुधिरभाऊ मुनगंटीवार यांनी केलेले ‘बहिण- भावाचे’ शाब्दिक चित्रण फार गाजले. नरेद्र मोदी कोलसिटीत आले या पेक्षा मुनगंटीवारांच्या वक्तव्याने रंगलेले द्धंदबभारी चचैत राहीले आहे. निवडणूक आयोगाला सुद्धा यात कार्यवाहीचे संकेत दयावे लागले. भा.ज.पा. कार्यकर्ते सुद्धा या घटनांनी गार पडल्याचे विष्लेषण करण्यात येऊ लागले आहे.
दुसरीकडे मुंगटीवारांना शह देण्याच्या नादात भावनिक आवाहन करणाऱ्या कांग्रेस जनांना सहाणभूतीच्या मुद्यावर मतदार तेवढे उचलून धरण्याच्या मानसिकतेत दिसत नसल्याने गोंधळ वाढला असल्याचे जाणकार बोलू लागले आहेत.
19 तारखेला चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. जेमतेम आठवडा उमेदवारांच्या हातात आहे. घडलेल्या, घडणाऱ्या घटनाक्रमांची घडी बसविताना उमेदवारांची दमछाक स्पष्टपणे जाणवत आहे.पक्षांतर्गत बंडखोरी, गटबाजी दिसून येत आहे. मतभेद, मनभेद चव्हाटय़ावर येत आहेत. काही ठिकाणीं नियोजन तर काही ठिकाणी नेत्यांचा अभाव वरून मतदारसंघातील मतदारांच्या गरजांना डावलून होणारा प्रचार मतदारांचे डोके तापवून सोडत असल्याने मतदारांनीच अल्टीमेटम देणे सुरू केल्याचे चित्र असून मुददयाचे ते बोला असा इशारा प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे उमेदवारांना देणे सुरू केल्याची चर्चा आहे.